चंद्रपूर- वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार, नागभीड तालुक्यातील मांगरूड शेतशिवारातील घटना

1381

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मांगरूड येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उजेडात आली. मारोती उईके (43) मृतकाचे नाव असून तो सोनुली या गावातील आहे.

मांगरूड गावातील शेतशीवारात शेतीकाम करण्यासाठी मारोती हा गेला होता. शेतशिवारात औषध फवारणीचे काम शेतात सुरु असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले, शेतशिवार परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या