चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, फक्त शीर व एक हात सापडला

1277

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कोलारा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या परिसरातली ही पाचवी घटना आहे. या शेतकऱ्याचे फक्त शीर व एक हात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्यातील कोलारा येथील राजू दडमल (वय 47) हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात दिसून आला. त्याच्या शरीराचा बहुतांश भाग वाघानं खाल्ला असून, डोकं व एक हात तेवढा शिल्लक आहे. वनविभागाला माहिती देण्यात आली असून ते घटनास्थळी पोहचले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या