
घरघुती वादातून पित्यानं स्वतःच्या पोटच्या दोन मुलांवर गोळीबार करीत स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. दोन मुलांपैकी एक मुलगा जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्यानं त्याला नागपूरला हलवण्यात आलं. ही घटना जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भगतसिंग वार्ड इथली आहे. मुलचंद द्विवेदी (वय-50) यांचा आकाश (वय -22) आणि पवन (वय – 20) या मुलांसोबत घरगुती कारणावरून वाद झाला. यामुळं मूलचंद यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत वडील मुलंचंद द्विवेदी यांनी आधी आकाशच्या छातीत गोळी झाडल्यानंतर दुसरा मुलगा पवनवर गोळी झाडली. यामध्ये वडील मुलचंद आणि आकाश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी नागपूर इथं हलवण्यात आलं. हल्लेखोर मुलचंद द्विवेदी हा भाजपा नेता तथा बल्लारपूर नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य शिवाचंद द्विवेदी यांचा भाऊ आहे.


































































