मुसळधार पावसाने चंद्रपुरातील रस्ते जलमय

अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात जनजीवन विस्कळीत झाले. गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते. आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक सर्वत्र अंधारल्याने महामार्गावरील वाहनांना देखील हेडलाईट लावून करावे मार्गक्रमण करावे लागले.

या पावसाने चंद्रपूर शहरातील रस्ते जलमय झाले. आझाद बागेजवळील नाला ओसंडून वाहू लागल्याने गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक सखल भागात पाणी साचले. दरम्यान, या पावसामुळे तापमानापासून नागरिकांना मात्र जरा दिलासा मिळाला.