
राज्यात सोमवारपासून हॉटेल्स, रेस्तराँ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चंद्रपुरातील हॉटेल्स आजपासून सुरू झाले. गेले सहा-सात महिने बंद असलेला हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने हॉटेल मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हॉटेल सुरू करण्यापूर्वी स्वच्छतेवर भर देण्यात आलाय. सर्व आसन व्यवस्था, खाण्यापिण्याची भांडी स्वच्छ करतानाचं चित्र बघायला मिळालं.
चंद्रपुरातील प्रसिद्ध व्हेज जंक्शन हॉटेलमध्ये तर प्रत्येक टेबलवर सॅनिटायझर ठेवण्यात आले असून, एन्ट्री पॉईंटला सॅनिटायझरसह थर्मल गन सुद्धा ठेवण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकाची तपासणी करूनच आत प्रवेश देण्याचा नियम हॉटेलमालकांनी घातलाय. त्यानुसार या सर्व सोयीसुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, आज पहिल्या दिवशी ग्राहकांचा म्हणावा तितका प्रतिसाद दिसून आलेला नाही. पण तरीही व्यवसाय सुरू झाल्याने मालकवर्ग मात्र खूश आहे.
पाहा व्हिडीओ-




























































