चंद्रपूर- तारांच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील सदगुरू कृपा तांदूळ गिरणीच्या मागे असलेल्या ताराच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 22 जानेवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.

माहिती मिळताच तांदूळ गिरणीचे मालक विलास गिरपुंजे यांनी वनाधिकार्‍यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव अभियान राबवून तारात अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढले.

घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांनी भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर बिबट्याचा पंचनामा वनाधिकारी करीत होते. पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या