चंद्रपूरमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मिंडाळा येथे तारेच्या कुंपणात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला. गावाच्या सीमेवर असलेल्या सद्गुरू कृपा राईस मिलचे हे कुंपण आहे. लगतच्या जंगलातून गावाकडे येत असताना या मिलच्या तारेच्या कुंपणात त्याचे पाय अडकले. स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शवविच्छेदनानंतर नेमके कारण पुढे येण्याची शक्यता विभागाने व्यक्त केलीय.