संपत्तीच्या वादातून सख्या भावानेच केला बहिणीचा खून; आई गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपत्तीचा वादातून सख्या भावानेच बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात घडली. या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली आहे. आरोपीचे नाव सुरज शंकर भोंडे ( 28 ) असून संजीवनी शंकर भोंडे ( 32 ) असे मृत बहिनीचे नाव आहे तर पुष्पा शंकर भोंडे (वय 58 वर्षे) असे गंभीररित्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे.

संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून घरात वाद सुरु होता. यात आई व बहीण हे अलग राहत होते तर भाऊ आणि वडील अलग राहत होते. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ आरोपी सूरज ला अटक केली असून वडिलांना देखील ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.