चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ

चंद्रपूरच्या शक्तिरूप महाकाली मातेच्या शारदेह नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने प्रारंभ झाला. महाकाली मंदिरात शारदीय नवरात्र मोठ्या भक्तिभावाने आणि भंडारा उधळून साजरा होत आहे. चंद्रपूरकरांचे कोणतेही शुभ कार्य प्रारंभ होते ते देवी महाकालीच्या दर्शनाने. उग्र रूपे असलेली ही जगन्माता दुष्टसंहारक आहे.

अश्विन व चैत्र नवरात्रासह दिवसातील अन्य दिवसही मातेच्या दर्शनासाठी दूरदुरून भाविक चंद्रपूरला येत असतात. प्रजाहितदक्ष गोंड राणी ‘हिराई’ ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या चार राज्यातील भाविक गर्दी करतात. यंदा मात्र देवी महाकाली मंदिर मोठ्या संखेच्या उपस्थितीत नवरात्र पूजेसाठी उघडण्यात आले.

विधिवत मंत्रोच्चारासह सकाळी घटस्थापना करण्यात आली. महाआरतीनंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले. चंद्रपूरकर नागरिकांनीही कोरोनाचा संसर्ग गेल्याने मंदिरात गर्दी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. एकदा नियमित उत्साही उत्सव बघायला मिळो, अशी भावना याप्रसंगी व्यक्त झाली.