Video- चंद्रपूरात पोलिसांना निर्जंतुक करण्यासाठी वाहन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना निर्जंतुक करण्यासाठी पोलीस विभागानं एक वाहन सज्ज केलं. हे वाहन शहरात आजपासून विविध चौकात फिरत असून, बंदोबस्त असलेल्या ठिकाणच्या पोलिसांचं निर्जंतुकीकरण करीत आहे. हायड्रोक्वीनक्लोराईड सोल्युशन यात असून, त्याचा शिडकावा केला जातो आहे. सध्या शहरात अनेक ठिकाणी अनावश्यक वाहतूक रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आला असून, पोलिसांची टीम तिथं कार्यरत आहे. दिवसभर ते अनेक लोकांच्या संपर्कात येतात. सुरक्षेसाठी त्यांना मास्क देण्यात आले असले, तरी संपूर्ण शरीर निर्जंतुक व्हावं, यासाठी हा उपाय करण्यात आलाय.