Video – चंद्रपूर शहरातील तलावात शेकडो मृत मासे आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात शेकडो मृत मासे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाच्या प्रदूषणाने नागरिक व पर्यावरणवादी सध्या चिंतित आहेत.

दोन दिवसांपासून मृत मासे किनाऱ्यावर येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यावर इको- प्रो पर्यावरणवादी संघटनेने याकडे लक्ष वेधले होते. आज मृत माशांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. तलावात नैसर्गिक पाण्याचा वाहता स्त्रोत नसल्याने या तलावात केवळ सांडपाण्याचा प्रवेश होत आहे.

अत्यंत घातक प्रदूषण आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे मासे मृत झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने तलावातील पाणी रिकामे करून यंदाच्या उन्हाळ्यात याचे खोलीकरण करत तातडीने लक्ष देण्याची पर्यावरणवाद्यांची मागणी असून अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

व्हिडीओ-