
चंद्रपुर शहरातील जूनोना चौक परिसरातील अभिमन्यु मेश्राम या फर्नीचर व्यावसायिकाच्या घरी वनविभागाच्या फिरते पथकाने धाड टाकली असता विना परवाना 12-13 सागवान चे कट साईज लाकुड व त्यापासून तयार केलेला टी टेबल, खिडकी हस्तगत करण्यात आली.
या मालाची किंमत लाखाच्या घरात आहे. सोबतच बाबुपेठ येथील वंदना मानुसमारे यांच्याकडून 4 कट साईज सागवान जप्त करण्यात आले, तसेच भास्कर गहुकर या व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सोमवारी पहाटे चंद्रपुर वनविभाग मोबाईल स्कॉट तसेच वनपाल व वनरक्षकांसह विभागीय वनअधिकारी दक्षता तथा प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे यांनी केली.
सर्व फर्निचर व्यावसायिकांनी विभागीय कार्यालयाकडून आवक जावक रजिस्टर नोंदणी व बिल बुक जमा करून नियमाने कार्य करावे, असे आवाहन विभागीय दक्षता वनअधिकारी चोपडे यांनी केले आहे.




























































