
चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप बघायला मिळत आहे. वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि STPF (special tiger protection force) चा जवान जखमी झाला आहे. चरणदास बन्सोड (56) असं ग्रामस्थाचं नाव आहे. तर सुनील गज्जलवार असं जखमी STPF जवानाचे नाव आहे.
चंद्रपूरात तीन वाघ आणि गावकऱ्य़ांमध्ये झडप, दोन जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप बघायला मिळत आहे. वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि STPF (special tiger protection force) चा जवान जखमी झाला आहे. #tiger #chandrapur pic.twitter.com/5jFflMe8er— Saamana (@SaamanaOnline) June 23, 2021
आज सकाळी पळसगाव येथील गाव तलावाजवळ 3 वाघ असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोकांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला यात गावकरी जखमी झाला. या घटनेची माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दलाला देण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोचलेल्या STPF च्या जवानावर देखील वाघाने हल्ला करून त्यातील एकाला जखमी केले. सध्या वाघ त्याच तलावाजवळ असून स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.



























































