चंद्रपूर – वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील जगदीश मोहुर्ले या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. शेतात ट्रॅक्टरने मशागत सुरु असल्याने हा शेतकरी बांधावर बसला असताना वाघाने अचानक हल्ला केला. मांगरुड शिवारात ही घटना घडली. वाघाने या शेतकऱ्याला जंगलात फरफटत नेले. संध्याकाली 6  वाजताच्या सुमारास घटना ही घटना घडली. माहिती मिळताच वनपथकाने शोध घेऊन शेतकऱ्याचा मृतदेह शोधला.