चंद्रपूर – दोन बिबट्यांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत सावली तालुक्यातील बोथली गावाजवळील नाल्यात 8 वर्षीय नर आढळला आहे. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत आहे, पण शरीर कुजल्यामुळे मृत्यूच्या नेमक्या कारणाचा निष्कर्ष काढता आलेला नाही.

दुसऱ्या घटनेत चंद्रपूर तालुक्यातील पायली-भटाळी गावाजवळ मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. या बिबट्याच्या शरीरावर झुंजीच्या जखमा असल्यामुळे वाघासोबत झालेल्या झुंजीत हा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या