चंद्रपुरात पेट्रोल टँकर-ट्रकची समोरासमोर धडक, आग भडकल्याने नऊ जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अजयपूर गावाजवळ गुरुवारी रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली.

ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर टायर फुटले आणि आग भडकली. या आगीमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. तसेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

पेट्रोल टँकर मधील चालक-वाहकांचा मृतात समावेश आहे, तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा कोळसा झाला आहे. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

अजय सुधाकर डोंगरे, प्रशांत मनोहर नगराळे, मंगेश प्रल्हाद टिपले, महिपाल परचाके, बाळकृष्ण तुकाराम तेलंग, साईनाथ बापूजी कोडापे, संदीप रवींद्र, हनिफ खान, अजय पाटील अशी मृतांची नावे आहेत.