चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या महिला सकाळी जंगलात सरपण गोळ करायला गेली असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मृत महिलेची ओळख पटली असून त्यांचे नाव वैशाली मांदाडे असल्याचे समोर येत आहे. मांदाडे या मूल तालुक्यातील असून सुशी गावाच्या रहिवासी होत्या. आज सकाळी त्या जंगलात सरपण गोळा करायला गेल्या होत्या. तेव्हा वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.