Video – चंद्रपूर जिल्हा परिषदेत 27 लाख रुपयांचा अपहार, आठ लिपिक निलंबित

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात धक्कादायक आर्थिक अपहार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांना देय नसलेली रक्कम लिपिकांनी स्वतःच्या खात्यात वळवत सुमारे 27 लाख रु. चा अपहार केला आहे. सात महिन्यापासून सुरू असलेला हा गैरप्रकार आता उघड झाला असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी8 लिपिकांना तडकाफडकी केले निलंबित केले आहे.

एकूण 27 लाखांचा निधी यात स्वतःच्या खात्यात वळविल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. आतापर्यंत 13 लाख रुपयांची वसुली देखील जिल्हा परिषदेने प्रकरणात केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक धागेदोरे तपासण्यासाठी चौकशीला सुरुवात झाली असून या सामूहिक आर्थिक अपहाराच्या प्रकारामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेत चर्चांना उत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या