
बारामतीत विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांसोबतच्या शेवटच्या भेटीचा फोटो शेअर करत आपले मन मोकळे केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्ट केली आहे. कालची दादांची आणि माझी शेवटची भेट…पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे.
आजही दादांच्या नसण्याची कल्पना मनाला मान्य होत नाही. क्षणोक्षणी वाटत राहते आता दादांचा फोन येईल, एखाद्या मुद्द्यावर ठाम शब्दांत चर्चा करतील, नेहमीसारखं हसत म्हणतील, “चला, कामाला लागूया.” दादा…आपली ही धक्कादायक एक्झिट आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा, निर्णयक्षम नेतृत्वाचा आधार अचानक हरपल्याची पोकळी शब्दांत मांडता येणार नाही. तुमची आठवण नेहमी येईल, तुमची उणीव नेहमी जाणवत राहील, असे बावनकुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
कालची दादांची आणि माझी शेवटची भेट…
पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे.… pic.twitter.com/yc93hXT8mF
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 28, 2026





























































