चंद्रावती पवार यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावंतवाडी तालुक्यातील सातर्डे येथील रहिवासी चंद्रावती चंद्रकांत पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी हरिश्चंद्र पवार यांच्या त्या मातोश्री होत.