ऑर्बिटरने पाठवली उच्च प्रतीची छायाचित्रे

1363
**EDS: BEST QUALITY AVAILABLE** New Delhi: NASA image released on Friday, Sept. 27, 2019, shows the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The high-resolution images captured by Lunar Reconnaissance Orbiter Camera (LROC) shows the Moon's unchartered south pole where the Chandrayaan 2 lander attempted to soft-land during the ambitious mission three weeks ago. (NASA Twitter/PTI Photo)(PTI9_27_2019_000023B)

दोन महिन्यांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेत विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्यामुळे मोहीम अपयशी झाली असे म्हटले गेले, मात्र या मोहिमेत अजूनही धुगधुगी कायम आहे. ऑर्बिटरवरील उपकरणांमुळे चंदामामाच्या पोटात दडलेली रहस्ये उघड होणार आहेत. कारण या इस्रोला उच्च प्रतीची छायाचित्रे पाठवली आहेत. त्यावरून चंद्रावर छोटे खड्डे स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे विक्रम लॅण्डर जेथे गडप झाले तेथे आता दिवस सुरू झाला आहे. यामुळे तेथील लॅण्डरवरील सौर पॅनेल्स कार्यान्वित होऊन ते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता बळावली आहे.

चांद्रयानावरील ऑर्बिटरमध्ये एकूण आठ उपकरणे (पेलोड) आहेत. त्यांच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर कोणकोणती खनिजे, द्रव्ये आणि रसायने आहेत याचा शोध घेतला जात आहे. याद्वारे चंद्रावरील मातीमध्ये असलेल्या कणांची माहिती मिळवण्यात आली आहे. सूर्य प्रकाशातील ‘क्ष’ किरणांनी चंद्राचा पृष्ठभाग उजळून निघाला आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बिटरमधील उपकरणांना ठरावीक वेळेत ठरावीक कामे दिलेली आहेत. त्यानुसार ही कामे व्यवस्थित सुरू आहेत.

चंद्रावर दिवस सुरू

चंद्राच्या अंधाऱया बाजूकडे उतरण्याचा प्रयत्न करणाऱया विक्रम लॅण्डरचा अजून काही पत्ता लागला नसला तरी त्या ठिकाणी शनिवारपासून दिवस सुरू झाला आहे. सौर पॅनेल्सद्वारे विक्रम पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकते, अशी इस्रोच्या संशोधकांना आशा आहे. दुसरीकडे, चांद्रयान-2 मोहिमेतील ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर सोडियम, कॅल्शियम, ऍल्युमिनियम, सिलीकॉन, टायटेनियम आणि लोह असे खनिजद्रव्य शोधायला सुरुवात केली आहे. लवकरच त्याबाबतही माहिती मिळेल असे इस्रोने स्पष्ट केले आहे.

सर्वात प्रभावी कॅमेरा

ऑर्बिटरवर बसवण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या कॅमेऱयाद्वारे चंद्रावरील छोटय़ात छोटी बाबही स्पष्टपणे दिसू शकणार आहे. हा कॅमेरा इतका प्रभावी आहे की, अंतराळ विज्ञानात वापरण्यात आलेला तो सर्वात जास्त शक्तिशाली कॅमेरा आहे, असेही म्हणता येईल. त्यामुळे चंद्रावर असलेले छोटे खड्डेही स्पष्ट दिसत आहेत. या खड्डय़ांना जर्मन संशोधक पालोन एच. लुडविग वोन बोगुस्लावस्की यांचे नाव देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या