लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, प्रियांका गांधींच्या जागी अविनाश पांडेंची प्रभारीपदी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. त्यात सर्वात मोठा बदल हा उत्तर प्रदेश काँग्रेस प्रभारी पदाचा असून प्रियांका गांधींच्या जागी अविनाश पांडे यांना प्रभारी पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. आता प्रियांका गांधी यांच्यावर कोणत्याही राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी नाही. तसंच, सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगढची जबाबदारी देण्यात आली आहे.

कुमारी शैलजा यांच्या जागी पायलट यांना नेमण्यात आलं आहे. रमेश चेनिथल्ला यांना महाराष्ट्राचे प्रभारी आणि मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आलं आहे. केसी वेणुगोपाल हे संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहेत. तर ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी असतील तर रणदीपसिंह सूरजेवाला यांना कर्नाटक राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.