ट्रायच्या नव्या दराविरोधात दूरचित्रवाहिन्यांची हायकोर्टात धाव, खंडपीठाने निकाल राखून ठेकला

mumbai-highcourt

केन्द्र सरकारने जारी केलेल्या नव्या दराविरोधात दूरचित्रवाहिन्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी दाखल याचिकेकरील आपला निकाल राखून ठेवला आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार टीव्ही चॅनेल्सना नवे सुधारित दर जाहीर करण्याची मुदत देण्यात आली तसेच संबंधित शुल्क कितीपर्यंत असावे याबाबतही निश्चित मर्यादाही आखण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या शर्तीही ट्रायच्या वतीने लागू करण्यात आल्या आहेत. या सुधारित शुल्क आकारणी पद्धतीला आणि नियमांना याचिकादारांसह फिल्म ऍण्ड टेलिक्हिजन प्रोडय़ूसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीने विरोध केला आहे. यामध्ये सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया, डिस्ने, झी एंटरटेनमेंट आदी टीव्ही कंपन्यांचा त्यात समावेश आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही 24 जुलै रोजी ट्रायने एक नवीन अधिसूचना जारी करत प्रसारकांनी नवीन दर लागू न केल्यास सक्तीने कारवाई करण्याचा इशारा दिला. त्याविरोधात वाहिन्यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेक्हा ट्राय 25 ऑगस्टपर्यंत त्यांच्या नवीन दर आदेशाची अंमलबजावणी करणार नाही, असे ट्रायच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या