पायलटच्या चुकीने विमान हायजॅकचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीहून अफगाणिस्तानात कंदहारला जाणाऱया विमानाचे अपहरण (हायजॅक) झाले असल्याचा इशारा पायलटने दिल्याने शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली. या विमानाच्या उड्डाणासाठी काही मिनिटे शिल्लक असताना वैमानिकाने चुकून हायजॅकचा इशारा देणारे बटण दाबल्याने अर्थाचा अनर्थ घडला. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा दलासह (एनएसजी), फायर ब्रिगेडचे जवान यांनी तत्काळ धावपट्टीवर धाव घेऊन विमानाला घेराव घातला. हे धावपट्टीवर सशस्त्र्ा जवान आल्याचे दृश्य पाहून कंदहारला निघालेल्या प्रवाशांची पाचावर धारण बसली. दोन तास या विमानाची सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली तेव्हा पायलटने चुकून बटण दाबल्याने हे घडल्याचे समजले. नंतर विलंबाने या विमानाने कंदहारकडे झेप घेतली तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.