चॅटजीपीटीमुळे मुले सांभाळणे होणार सोपे; ऑल्टमॅनने सांगितली अनोखी पद्धत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवी ती माहिती मिळवण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला जातो. परंतु आता याच चॅटजीपीटीचा वापर आता घरातील मुलांना सांभाळण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो, अशी खास आयडिया ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी दिली आहे.

ऑल्टमॅनच्या आयडियानुसार, आई-वडील आपल्या फॅमिली कॅलेंडरला चॅटजीपीटीशी जोडू शकता. प्रत्येक मुलांची आवड-निवड समजू शकता. एआयचा वापर सकाळी शाळेला जाण्यासाठी एक वैयक्तिक पॉडकास्ट तयार केले जाऊ शकते. पॉडकास्टमध्ये कुटुंबाच्या शेडय़ुलनुसार, काही गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो. यानंतर मुलांना खास आठवण करून देणे, दुसऱ्या मुलांचा येणारा जन्मदिवस, आवश्यक गोष्टी आणि अन्य माहिती मुलांना सांगितली जाऊ शकते. ऑल्टमनच्या या अनोख्या पद्धतीवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उपटल्या आहेत. काही युजर्सने टिप्पणी केली की, आई-वडिलांनी चॅटजीपीटीवर विश्वास करण्याऐवजी स्वतः मुलांशी बोलावे. तर काही यूजर्सनी खिल्ली उडवली आहे.