
सामना प्रतिनिधी । मुंबई
ऍप्सची लिंक डाऊनलोड करण्यास सांगून सायबर भामटय़ांनी बोरिवलीतील तरुणाची 2 लाख 89 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणूकप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा दिवसांपूर्वी तक्रारदाराला सायबर भामटय़ाने फोन केला. आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर लोन सेटलमेंटबाबत चौकशी केली. खात्यात अधिक पैसे जमा झाले आहेत. त्याची तपासणी करायची असल्याच्या भूलथापा भामटय़ाने मारल्या तेव्हा तक्रारदारांनी माहिती देण्यास नकार दिला. एका सोशल साइटवरील ऍप्सवर पैसे जमा झाल्याचे दिसत असल्याचे भामटय़ाने भासवले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने एक ऍप्स डाऊनलोड केल्यावर त्याने तक्रारदाराच्या पत्नीच्या क्रेडिट कार्डबाबत माहिती विचारली. त्यानंतर दीड तासात भामटय़ाने तक्रारदारांना 2 लाख 89 हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला.




























































