छत्तीसगढमध्ये एका तरुणाने केले दोन्ही गर्लफ्रेंडशी लग्न, दोघीही खूश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगढमध्ये नक्षलग्रस्त भागात एका तरुणाने आपल्या दोन्ही गर्लफ्रेंडशी एका मांडवात लग्न केले आहे. या लग्नाला तब्बल 500 वर्‍हाड्यांनी उपस्थिती नोंदवली होती. लग्नानंतर आपण खूश असल्याचे दोघींनी सांगितले आहे.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. चंदू मौर्या हा 24 वर्षाचा तरुण शेतकरी आणि मजूर आहे. तसेच इलेक्ट्रिसिटीची छोटी मोठी कामेही करतो. बस्तरमध्ये एके दिवशी चंदू विजेचा खांब दुरुस्त करायला गेला होता. तेव्हा त्याची ओळख 21 वर्षीय तरुणी सुंदरी कश्यपशी झाली. नंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

एक वर्षानंतर 20 वर्षीय तरुणी हसीना बघेल ही चंदूच्या गावात्त एका लग्नानिमित्त आली होती आणि तिची आणि चंदूची भेट झाली. तेव्हा दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. फोनवरून बोलून दोघांची ओळख वाढली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

पण चंदूने आपण आधीच सुंदरीशी आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. पण यावर हसीनाला काही आक्षेप नव्हता. सुंदरी आणि हसीना एकमेकींशी फोनवरही बोलत होते त्यामुळे दोघींची चांगलीच मैत्री झाली होती.

एके दिवशी हसीना चंदूच्या घरी आली आणि त्याच्यासोबत राहू लागली.  ही गोष्ट सुंदरीला कळाली तेव्हा तीही चंदूच्या घरी पोहोचली आणि ती सुद्धा या दोघांसोबत राहू लागली.

तिघे गावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, तेव्हा गावकर्‍यांनी आक्षेप घेतला. अखेर चंदूने ५ जानेवारी रोजी आपल्या दोन्ही प्रेयसींसोबत एकाच मांडवात लग्न केले. या लग्नाला सुंदरीचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. आपल्या घरचे आपल्यावर नाराज असाल्याचे सुंदरीने सांगितले पण तेही आपल्या नात्याला मान्यता देतील अशी अशा सुंदरीने व्यक्त केली आहे.