डेटिंगच्या नावाखाली व्यावसायिकाला लावला चुना

डेटिंगच्या नावाखाली महिला पुरवण्याचे सांगून व्यावसायिकला 15 लाख रुपयाना चुना लावला गेला आहे. फसवणूक प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे व्यावसायीक असून त्याचे विलेपार्ले परिसरात दुकान आहे. मार्च महिन्यात त्याना फोन आला होता. त्याकडे त्यानी दुर्लक्ष केले. तीन महिन्यानंतर त्याना पुन्हा एका महिलेचा फोन आला.डेटिंगच्या माध्यमातून पैसेदेखील दिले जातील असे त्याना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारानी मेंबरशिपच्या नावाखाली 25 हजार रुपये भरले. त्यानंतर कायम स्वरूपी लायसन्सचा बहाणा करून तक्रारदारादाराकडून 50 हजार रुपये उकळले.

जमा केलेले पैसे पुन्हा परत केले जातील अशा भूलथापा मारल्या. काही ना काही सांगून पैसे उकळणे सुरूच होते. पैसे भरून त्याना कोणत्याही महिलेचे फोटामदे पाठवण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्या तक्रारीची शहनिशा करून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या