सिद्धहस्ता!

1239

>> शेफ विष्णू मनोहर

सध्या देवीचा उत्सव सुरू आहे. म्हणूनच मी ठरवलं की आता आपल्या क्षेत्राला वेगळी कामगिरी कराणाऱया यशस्वी स्त्रियांना भेटून त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी व जीवनमान जाणून घेऊ. यानिमित्ताने आज आपण पुण्यातील कर्तृत्ववान तरिता शंकर यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. तरिता शंकर या पुण्याच्या प्रसिद्ध ’’इंदिरा ग्रुप ऑफ पर्सनच्या’’ चेअर पर्सन असून यांच्याकडे जवळपास 15 हजार विदयार्थी केजीपासून पीजीपर्यंत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली असून बरेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

मी त्यांना भेटलो ते त्यांच्या सुंदर अशा ’साशा’ या बंगल्यात. कारण तरिता शंकर यांच्याकडे जेवायला जाणं किंवा त्यांनी पार्टीला बोलावणं हा पुण्यात बहुमान समजला जातो असं मला आमचे मित्र डीडी अर्थात धनंजय देशपांडे यांनी आधीच सांगितलं होतं. ठरवल्याप्रमाणे मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर प्रसन्न वदनाने त्या स्वतः समोर आल्यात. भल्यामोठय़ा त्यांच्या घरात बरीच मंडळी कार्यरत होती.

गप्पांना सुरुवात करण्यापूर्वीच त्यांच्या घराच्या अंतर्गत सजावटीबद्दल मी त्यांना विचारले तर त्यांनी हसून सांगितले हे सगळं माझं कलेक्शन आहे आणि त्यात कुठेही भपकेबाजपणा जाणवतं नव्हता. उलट त्यावरून त्यांची संस्कृती कळत होती. मी जेव्हा त्यांना म्हटले की तुमची ख्याती आहे की तुम्हाला खाऊ घालायला व जेवण स्वतः बनवायला खूप आवडतं. तर त्या म्हणाल्यात हो! लहानपणापासून मला स्वयंपाकाची फार आवडं आहे. माझ्या स्वयंपाकघरात आता तीन-चार माणसे काम करतात. 30-30 वर्षे जुनी माणसं माझ्याबरोबर अजूनही कायरत आहेत. पण माझी स्वयंपाकाची आवड इतकी जास्त आहे की कुणी जेवायला येणार असेल तर मेनू डिझाईनपासून जातीने स्वतः लक्ष देते. एवढेच नव्हे तर काही पदार्थ मी स्वतः तयार करते. तेवढय़ात बोलता-बोलता त्यांनी कोथिंबीर वडी स्वतः तळून आणली. त्याचा आस्वाद घेत पुढे त्या म्हणाल्या की, माझ्याकडे महिन्यातून एक-दोन मेजवान्या होतात पण मी कुठल्याही कॅटरर्सला बोलवत नाही. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण कोणाला जेवायला घरी बोलावतो हा त्याचा सन्मान असतो आणि तो सन्मान करायला मला मनापासून आवडतं.

मी त्यांना म्हटलं तुम्हाला व्हेज -नॉनव्हेजमधलं काय आवडतं? त्यांनी लगेच उत्तर दिलं की मी शाकाहारी व मांसाहार दोन्ही पदार्थ खाते, पण शक्यतो शाकाहारी पदार्थच जास्त आवडतात. तरिताजींचा कामाचा व्याप इतका मोठा आहे, त्यावरून मी त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर देशात इतकं फिरता तर जेवणाचा प्रॉब्लेम येत नाही काय? तर त्या हसून म्हणाल्यात मुळीच नाही. ज्याला चांगलं खाऊ घालण्याची व खाण्याची आवडं आहे त्याला त्याचं अन्न बरोबर मिळतं. लंडन हे त्यांचं दुसरं घरचं म्हणता येईल. पुण्यातील जुनं ’’कॉफी हाऊस’’ ’’मिस्टेक मसाला’’ तसंचं ब्लू डायमंड मधील ’’शबरी’’ आणि उत्साहात त्यांना सांगितले जे ऐकून मला सुद्धा कौतुक वाटलं. ते म्हणजे त्या जगात कुठेही असल्या तरी मुलांच्या खाण्याबद्दल सकाळ-संध्याकाळ चौकशी करतात. परिपूर्ण आहार त्यांच्या पोटात जावा यासाठी स्वतः मून तयार करून स्वयंपाकीण बाईना देतात. ज्यावेळी घरी असतात तेव्हा मुलांचा स्वयंपाक स्वतः बनवून देतात अगदी डब्यापासून. यामागचं कारण त्यांनी सांगितलं असं की मुलांना आजकाल शाळेत जेवण मिळतं किंवा आमच्या येथील कोणीही सुद्धा त्यांना बनवून देऊ शकेल, पण एखादी आई जेव्हा आपल्या मुलांसाठी स्वयंपाक करते तेव्हा त्यामागची तिची भावना वेगळी असते व त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांच्याच हातचा डबा आवडतो हे विशेष. याच बरोबर मला वेगवेगळया पद्धतीचे सॅलड बनवायला आवडतात. जवळपास 100 प्रकारचे कॉम्बीनेशन त्यांनी स्वतः तयार केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये मुलांना जे जेवण देतात ते सुद्धा चांगलं पौष्टिक, उच्च दर्जाच व शक्यतो हिंदुस्थानी पद्धतीचं असावा असा त्यांचा आग्रह असतो.

लहानपणी मला स्वयंपाकघरात रमायला आवडायचं, फावल्या वेळात मी खेळ-भांडे खेळायची आणि एकदा आई घरात नसतांना मित्र-मैत्रिणींबरोबर काय, खेळायचं तर मी माझी आई कसा स्वयंपाक करते हे करून दाखवलं. जमेल तशी साडी नेसून आईचं मोठं ब्लाऊझ घालून आई म्हणून एक पदार्थ बनवला आणि माझी आई गुपचूप दाराआड बसून माझं कौतून बघतं होती. तिने मला अडवले नाही. आयुष्यात तिनेच मला अशा प्रकारची हिम्मत दिली नसती तर मी या पदाला पोहचली नसती. तिचं ’’जॅकपॉट’’ नावाचं पुस्तकं मी सगळयांना भेट देत असते. नंतर मग पुढे मी नेहमीच आईला स्वयंपाकात मदत करायची, पण पोळयांचा मात्र मला कटाळा यायचा. माझी आई म्हणायची अगं मोठेपणी काय करशील? तर मी म्हणायचं चार माणसे ठेवेली पोळया बनवायला आणि आज ती गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. ते सुद्धा आईच्या शिकवणीने. ऐवढे असले तरी माझ्या पोळया मात्र व्यवस्थित गोल होतात. आज तुमच्यासाठी सुद्धा मी स्वतः स्वयंपाक केलेला आहे आणि आम्ही जेवायला सुरुवात केली.

कोथिंबीर वडी
साहित्य – 2 वाटय़ा कोथिंबीर, 2 चमचे आलं-लसूण, मीठ, साखर चवीनुसार, 1 चमचा आमचूर पावडर, पाव-पाव चमचा हिंग, हळद , 3 वाटय़ा बेसन.

कृती – सर्वप्रथम आलं-लसूण पेस्ट फोडणीला घालून त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर, साखर, हिंग घालून परतून घ्या. नंतर यात चिरलेली कोथिंबीर थोडे परतल्यावर त्यामध्ये 4 वाटय़ा पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर बेसनाची पेस्ट घाला. नंतर एकत्र करुन थोडी वाफ आल्यावर हे मिश्रण एका ट्रेमध्ये थापून थंड करा. नंतर त्याच्या वडया पाडून तळून खायला दया.

आपली प्रतिक्रिया द्या