चेंबूर, बीकेसी आणि मालाडची हवा विषारी, हवेची गुणवत्ता आणखी खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणाच्या संर्वधनासाठी मुंबई उच्च न्यायालय, राज्य सरकार आणि महापालिकेने 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके पह्डण्यास परवानगी दिली असताना नागरिकांनी मात्र नियमावलीकडे दुर्लक्ष करीत सायंकाळपासून सकाळपर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली. यातच फटाक्यांमुळे मुंबईत 27 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाचीही तारांबळ उडाली. हे कमी की काय म्हणून, कचरा जाळल्याच्याही 23 तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. मुंबईत एअर क्वालिटी सरासरी इंडेक्स 244 पर्यंत पोहोचला. यामध्ये चेंबूर, मालाड, बीकेसी आणि बोरिवलीतील हवा अधिक विषारी असून या भागात ‘एक्यूआय’ 300च्या वर पोहोचला आहे.

(पान 1 वरून) मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता कमालीची घटल्याने पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये बांधकामांच्या ठिकाणांहून येणारी धूळ हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरल्यामुळे पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये बांधकामाचे ठिकाणी 35 फुटांपर्यंत बंदिस्त करणे, पाण्याची फवारणी करणे, डेब्रीजची वाहतूक उघडय़ा वाहनातून करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

फटाक्यांमुळे 27 ठिकाणी आग

– फटाक्यांमुळे मुंबईत 27 ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाकडे दाखल झालेल्या या तक्रारींनंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले. या घटनांमध्ये एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

– पालिकेने कचरा जाळण्यास बंदी घातली आहे. नियम मोडल्यास 100 रुपयांचा दंडही लागू करण्यात आला आहे. याची तक्रार करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री व्हॉट्सअप क्रमांक 8169681697’ वर 27 तक्रारी दाखल झाल्या आहेत.