वेटरने ग्राहकाला निर्वस्त्र करून नाचवलं, चेंबूरमधील डान्सबारमधील धक्कादायक घटना

39184

सामना ऑनलाईन । मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर अनेक ठिकाणी पुन्हा छमछम सुरू झाली आहे. त्यातच आज चेंबूरमधील डान्सबारमधील दादागिरीचा एक प्रकार समोर आला आहे. या बारमध्ये आलेल्या एका ग्राहकाला पैसे नसल्याने बारमधील वेटरने चक्क निवर्स्त्र करून नाचायला लावले. एका खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राज पंजाब या बारविरोधात व बारमधील वेटर्सविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

राज पंजाब बारमध्ये आलेल्या ग्राहाकाने बिल आल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसल्याचे वेटर्सला सांगितले. त्यानंतर वेटर्सने त्या ग्राहकाला मारहाण करत त्याला निर्वस्त्र केले व त्याला साईबाबांच्या गाण्यावर नाचायला लावले. याप्रकरणी ग्राहकाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर एका वेटरला अटक करण्यात आली. दरम्यान, ग्राहकाने इतर वेटर्सना देखील अटक करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या