
चेंदवण वेलवाडी येथील डोंगराचा काही भाग पावसाने खचला असून तेथील तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेवरून शिवसेना पदाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजना समिती कुडाळचे अध्यक्ष अतुल बंगे यांनी या डोंगराची पाहणी करीत सुरक्षेच्या दृष्टीने तेथे घरांना वाचवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत खासदार राऊत, पालकमंत्री सामंत व आमदार नाईक यांच्या माध्यमातून शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.
यावेळी अतुल बंगे यांनी चेंदवणला जात डोंगराची पाहणी केली. तसेच तेथील घरांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, सरपंच उत्तरा धुरी, उपसरपंच दीपक भरडकर, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत तेंडुलकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.




























































