
आयटी कंपनीच्या इंटर्नशीपसाठी गेलेले तीन जण चेन्नईत समुद्रात बुडाल्याची घटना धक्कादायक घटना घडली. यापैकी भंडारा जिल्ह्यात वरठी गावातील रहिवासी मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. एका जणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कॉग्नीझंट या कंपनीत इंटर्नशिपसाठी 26 जण चेन्नईला गेले होते. शनिवारची सुटी असल्याने सर्वजण चेन्नईच्या गोल्डन बीचवर फिरायला गेले होते. या महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या विद्यार्थ्यांचा एक गट पाण्यात उतरला होता. त्यापैकी तिघे बुडाले. सर्वांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी राज केदारी याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला, तर जळगावचा जय पाटील हा बेपत्ता आहे. मयुरी चौधरी हिचे नातेवाईक नागपुरातून चेन्नईकडे निघाले असून जय पाटील याचे नातेवाईक चेन्नई पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी हिच्या कुटुंबीयांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
15 दिवसांपुर्वीच लागली होती नोकरी
सहकाऱयांसमवेत सेल्फी घेताना मयुरी वाहून गेली. तिचा मृतदेहच बचाव पथकाच्या हाती आला. मयुरीला 15 दिवसांपूर्वीच नोकरी लागली होती. सुटीच्या दिवशी सहकाऩयांसोबत फिरायला गेली, पण ग्रुप सेल्फी काढताना अचानक मोठी लाट उसळली आणि तिच्यासह तिघे पाण्यात वाहुन गेले.


























































