
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयआयटी मद्रासच्या पदवीदान समारंभाचे थेट भाषण न दाखवल्यामुळे चेन्नई दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकाला निलंबित करण्यात आले. शिस्तभंगाची कारवाई करत आर. वसुमती यांच्यावर ही कारवाई करण्यात आली पण त्यांना कारण सांगण्यात आलेले नाही. मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण न केल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. मद्रास आयआयटीत 30 सप्टेंबरला हा समारंभ झाला.






















































