भुजबळांनी मौन सोडले, ‘बचेंगे तो और भी लढेंगे…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

‘मी जेलमध्ये असताना आठवड्यातून तीनदा माझ्या घरचे साहेबांच्या घरी जात होते. ठोकर लागल्यानंतर येते ती कामयाबी, बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी’, असे वक्तव्य राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केले. तब्बल दोन वर्षाने तुरुंगाबाहेर आलेल्या भुजबळांनी अखेर पुण्यात आपले मौन सोडले आणि राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

आपल्या भाषणादरम्यान भुजबळ यांनी विविध मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला. ‘न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि राहणार. न्यायदेवतेमुळे मी आज बाहेर येऊ शकलो आणि पुढे मी निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडेल. अनेकांनी मी बाहेर यावं म्हणून प्रयत्न केले’, असं म्हणत छगन भुजबळांनी अनेक राजकीय नेत्यांचे आभार मानले. तसचे ‘मी राष्ट्रवादी सोडणार असा चर्चा सध्या बाहेर रंगत आहेत होत्या. त्यावर आज मी खुलेपणाने बोलणार, कारण हा राष्ट्रवादीचा मंच आहे. आज मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही’, असे छगन भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षणाला विरोध नाहीच…

‘मराठा आरक्षणाला आपला कधीच विरोध नव्हता. पण माझा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे भासवण्यात आले. मी कशाला मराठा आरक्षणाला विरोध करू असे सांगत मराठा आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सध्या फक्त १७ टक्के आरक्षण उरले आहे आणि ७०० जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण? असा सवाल करत भुजबळ म्हणाले, मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे, मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, कुणीही सांगावं मी विरोध केला.’

मोदी सरकारचे वाभाडे काढले...

‘घोड्याला भाव आला, गाड्या सोडून लोकं घोडे घ्यायला लागले, पेट्रोल परवडत नाही, बाहेर आल्यानंतर खायचं काय? पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात १५-१५ लाख जमा, असं म्हणत भुजबळांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, …बरबादीयोंका जश्न मनाता चला गया, जो हो गया उसे भुलाता चला गया’, या शायरीमधून भुजबळांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले.

भुजबळांना मानले आभार

मी तुरुंगात असताना माझ्यासाठी सर्व पक्षांचे नेते पाठीशी राहिले. त्यासाठी मी सर्वांचेच आभार मानतो, असंही भुजबळ म्हणाले. माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे भुजबळांनी मनापासून आभार मानले.