Sambhaji nagar crime news – घटस्फोटित पत्नीचे आक्षेपार्ह फोटो तयार करून 74 लाखांची मागितली खंडणी

मुलीचे आक्षेपार्ह तसेच तिचा चेहरा वापरून 31 फोटो बनवून ते घराच्या पत्त्यावर स्पीड पोस्ट केले. या स्पीड पोस्टमध्ये शेवटच्या पानावर 74 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच खंडणी न दिल्यास गॅस सिलेंडरने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या घटस्फोटित पती मीर अकबर अली व सासरा मीर इनायत अली (दोघेही रा. इम्पेरियल लॉन्स, कटकटगेट) या दोघांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या 26 वर्षीय मुलीचे लग्न मीर अकबर अली याच्याशी झाले होते. कौटुंबिक वादानंतर मुलीने खुलनामाद्वारे पती अकबर अली याला घटस्फोट दिला. या वादात न्यायालयात दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. 1 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता एक स्पीड पोस्ट मिळाले. या पोस्टमध्ये ए फोर साईजचे एकूण 31 पानांवर फोटो होते. त्यातील चार कागद फिर्यादीच्या मुलीच्या शिक्षणाविषयी होते. काही फोटो हे मुलीचे वैयक्तिक होते. जे अश्लीलतेने दाखविण्यात आले. काही फोटो हे त्यांच्या मुलीचे आणि मुलीच्या मैत्रिणीचे होते. सदर फोटो आपत्तीजनक होते.

याशिवाय फिर्यादीच्या मुलीला त्वचारोग असल्याचाही काही फोटोतून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह फोटोसह अखेरच्या पानावर फिर्यादी व आरोपीविषयक न्यायालयात असलेल्या केसची माहिती देत 74 लाख रुपयांची खंडणी मागितली. जर पैसे दिले नाही, तर गॅस सिलेंडरने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार जाधव हे करीत आहेत.