जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या संपाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयांसमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे, सरकारने टाकलेला दबाव झुगारून कर्मचारी, शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.