
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर येथील 29 प्रभागातील 115 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. यामध्ये 58 जागा या महिलांसाठी असणार आहे. तर 57 जागा या खुल्या असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण 30 महिला, सर्वसाधारण पुरुष 30, ओबीसी महिला 16 असून, ओबीसी पुरुष 15 आहेत. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये 11 पुरुष आणि 11 महिला नगरसेवकांसाठी आरक्षण असणार आहेत.
छ. संभाजीनगर महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या – 115 असून यामध्ये महिलांसाठी राखीव- 58, सर्वसाधारण महिला – 30, ओबीसी महिला – 16, अनुसूचित जाती महिला – 11, अनुसूचित जमाती महिला – 1, खुल्या जागा – 57, सर्वसाधारण पुरुष – 30, ओबीसी पुरुष – 15, अनुसूचित जाती पुरुष – 11, अुनुसूचित जमाती पुरुष – 1
काही प्रभागांमध्ये गेल्यावेळच्या पुरुष नगरसेवकांच्या जागी आता त्यांच्या पत्नी सांभाळू शकतात असं चित्र आहे. यामध्ये माजी महापौर नंदकुमार घोडलेंचा 29 क्रमांकाचा प्रभाग OBC आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळं नंदकुमार घोडेले यांना धक्का बसला आहे.


























































