
बेकायदा लावलेले होर्डिंग काढताना विजेच्या उच्च तारेला स्पर्श झाल्याने महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी महानगर पालिकेने बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी उच्च न्यायालयाने बेकायदा होर्डिंग काढण्याच्या आदेशावर धुळीची पुटे साचली आहेत. राजकीय नेते, फुटकळ कार्यकर्ते, गुंडांच्या दहशतीपुढे शेपूट घालून बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली जात नाही. त्याचाच हा परिणाम असून एका निरपराध कर्मचाऱ्याला मात्र नाहक आपला जीव गमवावा लागला.
बेकायदा होर्डिंगमुळे शहर विद्रूप झाले आहे. शहरातील कोणताही चौक, रस्ता या होर्डिंगनी शिल्लक ठेवलेला नाही.





























































