छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत; शिवनेरी, रायगड आणि राजगडाचाही समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. यात किल्ले शिवनेरी, रायगड आणि राजगड या किल्ल्यांचाही समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ल्यांच्या युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला तसेच ज्या किल्ल्यावर महाराजांनी स्वराज्याची राजधानी वसवली तो किल्ले रायगड जिल्हाही या वारसा यादी. समाविष्ट करण्यात आला आहे.

युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 12 जिल्ह्यांना वारसा यादीत समाविष्ट केले आहे. त्यात शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यालाही वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.