
परिस्थितीवर मात करत आजवर अनेक तरुणांनी आपले स्वप्न साकार केले आहे. अशीच एक काैतुकास्पद कामगिरी छत्तीसगडमधील एका तरुणाने केली आहे. इथल्या नववी पास विद्यार्थ्याने वडिलांना कामात मदत करता करता आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सय्यद सैफ असे या मुलाचे नाव असून त्याने भंगारापासून नवीकोरी बाईक तयार केली आहे. यासाठी भंगारातील पाच वेगवेगळ्या बाईक्सचे पार्टस् वापरले आहेत. या बाईकला सुझुकीचे इंजिन असून बॉडी यामाहाची आहे तर टायर स्कूटरचे बसविण्यात आले आहेत. सय्यद हा धमतरी जिह्यातील सिंगापूर गावचा रहिवासी आहे. त्याचे वडिल मॅकेनिकचे काम करतात. अभ्य़ासात लक्ष लागत नसल्याने तो सध्या वडिलांना गॅरेजमध्ये मदत करतो. मेकॅनिकचे काम शिकता शिकता त्याने ही बाईक तयार केली आहे.

























































