चिया सिड्स आणि अळीव आरोग्यासाठी ठरेल उपयोगी…असा होईल फायदा…

चिया आणि अळीव दोन्ही बिया आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. दररोज पोषक आहारासोबत या बियांचे सेवन केल्याने पचन सुधारते, बॅड कोलेस्ट्रोरॉल कमी करण्यास याची मदत होते. तसेच पचनाची क्रिया सुधारण्यास मदत होते.

व्यायाम करणाऱ्यांना आणि खेळाडूंना या बियांमुळे आवश्यक पोषक द्रव्ये मिळत असल्याने त्यांच्याकडून याचे सेवन जास्त प्रमाणात होते. तसेच याचे उपयोग समजल्यामुळे आता या लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये असलेले प्रथिने, जीवनसत्त्वे, आणि फायबर यांचा आरोग्य  सुधारण्खयास मदत होते.

आपण चिया सिड्स आणि अळीव यांपैकी कोणती बियाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घेऊ

चिया सिड्स


चियासिड्स मध्ये विरघळणारे फायबर असते जे पाण्यात मिसळल्यावर जेल बनते. हे जेल पचनक्रिया सुधारते आणि शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखते . तसेच वजन कमी करण्यास मदत करणे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते. त्यात फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने आणि अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.

अळीव


अळीवच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉलेट, जीवनसत्त्व ‘क’ आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हिमोग्लोबिन वाढवणे, हाडे मजबूत करणे, सांधेदुखी कमी करणे, पचन सुधारणे आणि रक्तशुद्धी करणे. महिलांसाठी मासिक पाळीचे नियमन करण्यास आणि प्रसूतीनंतर दूध वाढवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

आरोग्यासाठी कोणत्या चांगल्या
चिया आणि अळीव दोन्हीही आरोग्यदायी आहेत. तुमच्या आहारात दोन्हीचा समावेश करणे चांगले . जर तुम्हाला दोघांपैकी एक निवडायचे असेल तर चिया बियाणे निवडा, कारण अळीव बियाण्यांवर अद्याप मानवी आरोग्यावर पूर्णपणे संशोधन झालेले नाही.

ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या