सरन्यायाधीशांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलंगणा दौऱ्यावर आल्यामुळे त्यांना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सरन्यायाधीशांना कोणत्या प्रकारचा संसर्ग झाला आहे याबाबातची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. 12 जुलै रोजी ते हैद्राबाद येथील नालसर लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होते.