चिखली काँग्रेसला धक्का; दोन माजी नगराध्यक्ष भाजपात

1934

बुलढाणा जिल्ह्यात चिखली शहर तसे राजकीय राजधानी म्हणून मानले जाते. या शहरातील राजकारणाची पडसाद अख्ख्या जिल्ह्यात उमटत असतात. त्याच चिखली शहरातील काँग्रेसचे दोन माजी नगराध्यक्ष सलीम मेमन व जस्सुसेठ श्रीवास्तव हे दोन नेते उद्या भाजपात प्रवेश करीत आहे. तसे प्रसिद्धपत्रक आज त्यांनी जाहीर केले आहे.

सलीम मेमन हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार सुद्धा आहे. या दोघांचा भाजपात प्रवेश म्हणजे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांना धक्का मानल्या जात असून ऐन निवडणुकीत हा प्रवेश होत असल्यामुळे राजकीय समीकरण बदलून याचा फायदा युतीच्या उमेदवार श्वेता महाले पाटील यांना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या