
अल्पवयीन मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने 29 दिवसांच्या मुलाला विकणाऱ्या आणि ते बाळ विकत घेणाऱ्या तिघा महिलांना पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यामुळे दया नायक व पथकाने पकडलेल्या आरोपींची संख्या 11 वर गेली आहे.
मुंबई व पालघर जिह्यातील आंतरराज्य टोळीतील आठ जणांना एसीपी महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने बेडय़ा ठोकल्या होत्या. त्यानंतर दापोली येथील सनाबार चिपळूणकर या महिलेचे 29 दिवसांच्या मुलाची अडीच लाखांत खरेदी केली असून खेड येथे राहणाऱ्या तब्बसुम (42) आणि सफिया अली या दोघी दलाल महिलांचा सदर बाळाच्या खरेदी-विक्रीत सहभाग असल्याची माहिती युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार दया नायक व त्यांच्या पथकाने तिघींनाही अटक करून त्यांच्याकडून 29 दिवसांच्या मुलाची सुखरूप सुटका केली.अल्पवयीन मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली असून यापुढेही कारवाई सुरू राहील असे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले.





























































