
आई-वडिलांचे छत्र नाही, कुटुंबाचा भक्कम पाठिंबा नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, अशा प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत मानखुर्द येथल्या बालगृहातील बालकांनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली. खचून न जाता परिस्थितीला तोंड देत बालगृहातील 17 मुला-मुलींनी जिद्द, प्रामाणिकपणा व कष्टाच्या जोरावर शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
समाजातील उपेक्षित घटकातून आलेली ही अनाथ, निराधार बालके काळजी व संरक्षण अधिनियम अंतर्गत बालगृहात दाखल केली आहेत.चेंबुर चिल्ड्रन्स होम येथील नऊ मुलं आणि बालकल्याण नगरी येथील आठ मुलींनी या वर्षी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
चेंबूर चिल्ड्रन्स होम येथील उत्तीर्ण विद्यार्थी
यश पिंगळे 75.60 टक्के, पुष्कर कांबळे 66.20 टक्के, रमजान शेख 60.20 टक्के, जाकीर शेख 58.80 टक्के, सलमान शेख 56.80 टक्के, समीर पाणी 47.00 टक्के, धीरज गिरी 38.40 टक्के, इमरान शेख 39.80 टक्के, शुभम मकवाना 35.00 टक्के.
बाल कल्याण नगरीतील यशस्वी विद्याार्ंथनी- शाहनाझ शेख 75.20 टक्के, संजना नुनिचा 74.60 टक्के, आमिना बगदादी 67.80 टक्के, जागृती राजगुरू 60.80 टक्के, गौरी झा 60 टक्के, आदिती शिंदे 59.20 टक्के, प्रीती बालाजी 53.80 टक्के, अक्षरा इगले 48.20 टक्के.
प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आमच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत त्यांची प्रतिभा दाखवून दिली आहे. आमचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत याचे चांगले फळ आज बघायला मिळाले. – प्रवीण भावसार, मुख्याधिकारी
























































