भर दुष्काळात शेतकऱ्यांची मिरचीवर मदार….!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भोकरदन

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना देखील काही भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या थोड्याफार साचलेल्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे मिरची पिकाची लागवड केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी मिरची च्या पिकावर बहुतांश शेतकऱ्यांची मदार आहे.

सध्याच्या काळात भोकरदन तालुका हा दुष्काळी परिस्थिती आणि विशेषतः पाणीटंचाईने मोठ्या प्रमाणावर ग्रासला असून गत सलग तीन ते चार वर्षांपासून या भागात दुष्काळ पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये मध्ये थोडेफार साचलेल्या पाण्यावर थेंबाथेंबाने पाणी देऊन मिरची पिकाची लागवड केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न चोहीकडे निर्माण झाला असून टंचाई काळामध्ये मिरची हे पीक उत्पादनासाठी योग्य असल्या कारणाने तात्पुरते का होईना थोडेफार पाणी विहिरीमध्ये
असलेल्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केल्याचे दिसून येत आहे.