चीनमधील नोटांनाही कोरोना! 84 हजार कोटींचे चलन नष्ट करणार

3531

‘कोरोना’ व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. चीनचे चलन असलेल्या युआनलाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे सुमारे 84 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा नष्ट केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.

‘कोरोना’मुळे मृतांची संख्या 1775 वर गेली असून 75 हजारांवर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हुबेई प्रांतातील आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे, मात्र रुग्णालये, बाजारपेठा, बस, रेल्वेसेवा आदी ठिकाणांहून संसर्ग झालेल्या नोटा चलनात आल्याची शक्यता पीपल्स बँक ऑफ चायनाकडून व्यक्त होत आहे. बँकेचे डेप्युटी गव्हर्नर फैन यिफेई यांनी याबाबत सांगितले की, 17 जानेवारीपासून आतापर्यंत 600 अब्ज युआन मूल्याच्या (सुमारे 6.11 लाख कोटी रुपये) नोटा चलनात आणण्यात आल्या. यातील 4 अब्ज युआन (सुमारे 28,581 कोटी रुपये) सुरुवातीला नष्ट करावे लागेल. या जुन्या नोटा आहेत. तसेच चीनच्या दक्षिण राज्यांमधील सुमारे 55,780 कोटी रुपये मूल्याच्या युआनच्या नोटाही नष्ट कराव्या लागणार आहेत.

चीनच्या प्रयोगशाळेतच ‘कोरोना’ची निर्मिती

अवघ्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसची निर्मिती चीनमध्येच प्रयोगशाळेत झाल्याची धक्कादायम माहिती आहे. चीनच्या साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने याबाबत खुलासा केला आहे. हुबेई प्रांतात वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल संसर्ग रोग पसरू शकतात अशा प्राण्यांवर संशोधन सुरू होते. त्यात 605 वटवाघळांचा समावेश होता. प्रयोग सुरू असताना वटवाघळाने एका संशोधकाचा चावा घेतला. त्यावेळी वटवाघळाचे रक्त त्या संशोधकाच्या शरीरात गेल्याचा दावा शास्त्र्ाज्ञांनी केला आहे.

जपानमधील क्रुझवर आणखी 99 जणांना ‘कोरोना’

जपानच्या योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील प्रवाशांचे प्राण संकटात सापडले आहेत. क्रुझवर 3799 प्रवासी असून त्यांनी आणखी 99 जणांना संसर्ग झाला आहे. यापूर्वी 45 जणांना संसर्ग झाला होता. दरम्यान, कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये 14 अमेरिकन नागरिक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या