चीनच्या डार्क फॅक्टरी मॉडलने संपूर्ण जगाला भरली धडकी

चीनने आता पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक फॅक्टरी उघडल्या आहेत. याला डार्क फॅक्टरी असे म्हणतात. या फॅक्टरीमध्ये केवळ रोबोट काम करतात. एकही व्यक्ती काम करताना दिसणार नाही. हे रोबोट अंधारात आणि कोणताही ब्रेक न घेता काम करत असल्याने संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. फोर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आताच इशारा दिला आहे की, जर अमेरिका या स्पर्धेत सहभागी झाला नाही, तर अमेरिकेच्या उद्योगाचे कोणतेही भविष्य उरणार नाही. चीनमध्ये फॅक्टरीत काम करण्यासाठी एकही व्यक्ती नाही, सर्वच्या सर्व रोबोट काम करत आहेत. चीनचे हे पाऊल केवळ नफा कमवण्यासाठी नाही, तर चीनमध्ये वयोवृद्धांची संख्या वाढत असून तरुणांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रोबोटआधारित उत्पादन मॉडल चीनच्या उद्योगात दिसत आहे.