
स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र घरांच्या वाढलेल्या किंमती, व्याजाचे वाढलेले दर, डाऊनपेमेंटसाठी लागणारी रोख रक्कम यामुळे अनेकजणांना घर घेणं कठीण जातं. मात्र चीनमधील एका कंपनीने या मात्र घर घेणाऱ्यांसाठी एक भारी योजना आणली आहे. या कंपनीने चक्क डाऊन पेमेंटसाटी लागणाऱ्या मोठ्या रोख रकमेच्या ऐवजी चक्क गहू व लसूण देखील देऊ शकतात.

हेनान या प्रांतातील सेंट्रल चायना रियल इस्टेटने ही ऑफर काढली आहे. त्याची जाहीरात देखील त्यांनी केली आहे. चीनमध्ये घर खरेदीसाठी तब्बल 1,60,000 युआन द्यावेलागातात. मात्र या कंपनीने फक्त गहू द्या आणि घर खरेदी करा. शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ही योजना लागू केल्याचे म्हटले आहे.

”सोमवारी सुरू झालेली ही ऑफर येत्या 10 जुलै पासून सुरू राहणार आहे. ही कंपनी सध्या सहा लाख युआन ते नऊ लाख युआन किंमतीचे घर विकले जातात. त्यातील 1,60,000 युआन डाऊनपेमेंट करावे लागते. मात्र आता हे डाऊनपेमेंट न करता त्यासाठी आता लोकांना गहू व लसूण देखील देता येणार आहे”, असे चीनमध्ये एका स्थानिक दलालाने वृत्तसंस्थांना सांगितले आहे.

























































